loksabha election 2024

तिसऱ्या टप्प्यात आमचं हक्काचं मतदान मिळालं, निकाल आमच्याच बाजूने; एकनाथ शिंदे यांचा दावा

By Karyarambh Team

May 07, 2024

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी विकास केला, गेल्या दोन वर्षात आम्ही राज्याचा विकास केला, त्यामुळे जनता विकासाच्या बाजूने मतदान करत आम्हाला निवडून देईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही आम्हालाच जागा मिळतील असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचं हक्काच मतदान आमच्या लोकांनी उतरवलेलं आहे, मतदानाचा तिसरा टप्पादेखील महायुतीच्या बाजूनेच आहे. राज्यात पार पडलेल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यात महायुतीला जास्त जागा निघतील. तिसऱ्या टप्यात महायुतीला चांगलेच मेजॉरिटी मिळेल, बहुमत मिळेल. कारण दोन वर्षात  महायुतीने केलेले काम आणि दहा वर्षात मोदीजींनी केलेले काम यामुळे लोक शेवटी काम आणि विकासाकडे बघूनच मतदान करत असतात.