dexamethazone-covid-19-drugs

देश विदेश

आनंदाची बाब, कोरोनावर खात्रीशीर औषध सापडलं

By Karyarambh Team

June 16, 2020

echo adrotate_group(3);

नवी दिल्ली  : जगात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनावर अखेर हमखास गुण देणारं औषध सापडलं आहे. युकेतील शास्त्रज्ञांनी म्हटल्यानुसार डेक्सामेथाझोन हे औषध व्हेंटीलेटर लावलेल्या रुग्णाला दिल्यास तीनमधील प्रत्येकी एक रुग्ण वाचत आहे. विशेष म्हणजे हे औषध स्वस्त आहे.echo adrotate_group(6);

युकेतील शास्त्रज्ञांच्या मते जगभरातील शास्त्रज्ञ विविध लस आणि औषधांचा शोध घेत आहेत. आता ज्या लस बाजारात येणार असा दवा केला जात आहे त्या सगळ्यामध्ये डेक्सामेथाझोन हे औषध आहे.  डेक्सामेथाझोन गुणकारक ठरेल का, हे या चाचण्यांमधून तपासलं जात आहे. यापुर्वी हे औषध ज्या ज्या रुग्णांसाठी वापरण्यात आले त्या  व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा धोका डेक्सामेथाझोन औषधानं काही प्रमाणात कमी केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या सुरुवातीपासूनच यूकेमध्ये डेक्सामेथाझोनचा वापर केला गेला असता, तर सुमारे पाच हजारांपर्यंत जणांचे जीव वाचू शकले असते, असं संशोधकांचं म्हणणं आहे. शिवाय, सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या गरीब देशांना याचा खूप फायदा होऊ शकला असता. हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. हे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.echo adrotate_group(8);

20 पैकी 19 जण हॉस्पिटलमध्ये जातच नाहीत

कोरोना झालेले 20 पैकी 19 रुग्ण हॉस्पिटलमध्ये जातच नाहीत. भरती न होताच ते बरे होतात. हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्यांपैकीही बहुतांश जण बरे होत आहेत. मात्र, त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज भासतेय. या हाय-रिस्क रुग्णांना डेक्सामेथाझोन गुणकारी ठरत असल्याचे दिसून येतेय. या औषधामुळे मृत्यूदर आता नक्कीच कमी होऊन कोरोनाची भिती देखील दूर होईल.echo adrotate_group(9);

 ‘बायोटेक कंपनी मॉडर्ना’ची लसही शेवटच्या टप्प्यात

करोनाचा सर्वत्र होणारा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभरात लस निर्मितीचे काम सुरु आहे. विविध लस संशोधन प्रकल्प चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहेत. अमेरिकेतील ‘बायोटेक कंपनी मॉडर्ना’ या संशोधन संस्थेची कोरोना व्हायरसवरची लस शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. जर हा टप्पा पार पडला तर जुलै महिन्यात कोरोना विषाणूवरची अधिकृत लस तयार असेल, असा दावा या संस्थेकडून केला जात आहे. जगभरातील विविध देशात कोरोना विषाणूवरच्या लसीचं संशोधन सुरूवातीच्या टप्प्यात असताना अमेरिकेची लस आता शेवटच्या चाचणीच्या टप्प्यावर पोहचली आहे.  या लसीची अंतिम चाचणी जुलै पासून सुरू होणार असून जवळपास 30 हजार कोरोना बाधीत रूग्णांवर लसीची चाचणी पार पडेल, असंही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरस विरोधातील हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे.  या चाचणी दरम्यान काही बाधीत रूग्णांना या औषधाची मूळ लस तर काही रूग्णांना डमी असलेली लस दिली जाईल. कोरोना विषाणूसाठी जास्त परिणामकारक ठरणार्‍या लसीची पडताळणी करणं यामुळे शक्य होणार आहे. अमेरिकेतील कोरोना बाधीत रूग्णांवर ही चाचणी केली जाईल. echo adrotate_group(10);