बीड

सलगरच्या लॉकरमध्ये दोन किलो सोने अन् मोठी रोकड!

By Keshav Kadam

May 31, 2024

घबाड सापडल्याने खळबळ

बीड दि.31: आर्थिक गुन्हे शाखेचे लाचखोर हरिभाऊ खाडे यांच्या घरात कोटींचे घबाड सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा पाटबंधारे कार्यकारी अभियंता सलगरच्या लॉकरमध्ये दोन किलो सोने अन् रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस स्टेशन परळी शहर गुरंन.73/2024 कलम 7, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील मुख्य आरोपी राजेश आनंदराव सलगरकर, कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग,परळी यांचे मिरज जिल्हा सांगली येथील युनियन बॅंक ऑफ इंडिया बॅंकेतील लॅाकरची झडती शुक्रवार, दि. 31 मे रोजी आरोपी सलगरकर यांचे उपस्थितीत व पंचासमक्ष घेतली असता रोख रक्कम 11 लाख 89 हजार रुपये व 2 किलो 105 ग्रॅम ज्यामधे (1114 ग्रॅम वजनाचे 7 बिस्कीटे व 991 ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिणे) किंमत अंदाजे 1 कोटी 50 लाखअशी एकुण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयाची मालमत्ता मिळुन आली. रोख रक्कम व सोन्याचे दागिणे पंचासमक्ष जप्त करुण ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घरझडती पथक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड,लहनुमान गोरे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी यांनी केली.