बीड दि.9 : क्लासवन अधिकारी गलेगठ्ठ पगार असतानाही सर्वसामान्यांकडून लाचेच्या स्वरूपात शेणखताना आपण पाहिलेले आहेत. मात्र असेच लाच घेताना एका क्लासवन अधिकाऱ्याला बीड एसीबीने पकडले. चौकशीत त्याकडे तब्बल साडेतीन कोटी रुपयांची अपसंपदा असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवरही अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने केली आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शंकर किसनराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयकुमार शशिकांत कोकने (वय 51, तत्कालीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई जि. बीड.(वर्ग 1) सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई,(R.D.D.-4 ) रा.पाखल रोड.नाशिक व त्याची पत्नी ज्योती संजकुमार कोकणे (रा.नाशिक) यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे 3 कोटी 2 लाख 64 हजार 141 रुपये म्हणजेच ज्ञात उत्पन्न स्रोतापेक्षा सुमारे २३८.८४ टक्के जास्त अपसंपदा आढळून आली. आरोपी लोकसेवक श्री संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई
(वर्ग १ ) रा.पखाल रोड नाशिक यांचे विरुद्ध दिनांक 22 फेब्रुवारी 2022 रोजी सापळा कारवाई नंतर पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे गु.र.नं.274/2022 अन्वये कलम 7, भ्र.प्र.अधि.1988 अन्वये दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.
लोकसेवक यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे (दि.01/09/2010 ते दि.22/06/2022) चे दरम्यान लोकसेवक श्री. संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई ( वर्ग १) यांनी त्यांचे सेवा कालावधीतील परिक्षण कालावधी दरम्यान सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा रुपये 302 64 141.08 रुपये म्हणजेच(238.84 टक्के) रकमेची अपसंपदा संपादित केली आहे. एकूण अपसंपदे पैकी श्री संजयकुमार शशिकांत कोकणे यांची पत्नी सौ. ज्योती संजय कुमार कोकणे यांनी सुमारे ,1,12,60,000/-( एक कोटी बारा लाख साठ हजार रुपयाची) मालमत्ता स्वतःच्या नावे धारण करून लोकसेवक श्री संजयकुमार कोकणे यांना अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे (प्रोत्साहन दिल्याचे) उघड चौकशीत निष्पन्न झाले म्हणून लोकसेवक श्री संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई जिल्हा बीड,(वर्ग 1) सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई,(R.D.D.-4 )मूळ रा. येवला तालुका येवला जि. नाशिक ह. मु. पखाल रोड वडाळा नाशिक यांचे विरुद्ध कलम 13 (1)(ब) व ,13 (2)भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 व लोकसेवक श्री संजयकुमार कोकणे यांना हेतूपुरस्सर व बेकायदेशीरपणे अपसंपदा मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून सौ ज्योती संजय कुमार कोकणे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 (संशोधन ,2018) चे कलम 12 प्रमाणे. आरोपी लोकसेवक संजय कुमार कोकणे व त्यांची पत्नी सौ ज्योती कोकने यांचे विरुद्ध पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे गु.र.नं.-294 /2024 कलम 13(1)(ब) व 13(2),12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक युनूस शेख आदींनी केली.