golibar

मुंडेंच्या नाथर्‍यात उसन्या पैशावरून मुंडेंकडून मुंडेंसाठी हवेत गोळीबार!

बीड

परळी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी । परळी
दि.3 : पैशाच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून नाथर्‍यात nathara गोळीबार केल्याची घटना शनिवारी (दि.3) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पैसे उसने का दिले नाहीत म्हणून प्रकाश अशोक मुंडे (रा.नाथरा ता.परळी) याने हवेत गोळीबार केला. या प्रकरणी महादेव केशव मुंडे (रा.नाथरा ता.परळी) यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रकाश मुंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांनी दिली. दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथर्‍यात उसन्या पैशासाठी एका मुंडेंकडून दुसर्‍या मुंडेंसाठी हवेत गोळीबार झाल्याने चर्चांना पेव फुटले आहे.