कुटे, कुलकर्णी, आमटेंच्या घरासह कुटेग्रुपच्या कंपन्यावर ईडीचे छापे

बीड

बीड दि.10 : – लाखो ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर पोलीस कोठडीत असून इतर आरोपी फरार आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.9) रात्रीच्या सुमारास कुटे यांच्या बीड, छत्रपती संभाजीनगर येथील घर, दुकान, फॅक्ट्री व इतर मालमत्तावर व संचालक मंडळातील कुलकर्णी, आमटे यांच्या घरी सक्त वसुली संचलाणलंय अर्थात ईडीने छापे घातले आहेत.

सुरेश कुटे यांना दोन अडीच महिन्यापूर्वी अटक झाल्यानंतर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु झाली होती. दरम्यान आतापर्यंत कुटे विरोधात तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे चाळीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता ईडीची इंट्री झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून राधा क्लोथ सेंटर, हिरालाल चौक, एम आयडीसी येथील फॅक्ट्री, गोडावून, घर, संभाजीनगर येथील फॅक्ट्री सील केली असल्याची माहिती मिळत आहेत. यामुळे कुटे यांच्या अडचणीत अधिक वाढ झाल्याचे दिसत आहे. तर अनेक गुन्ह्यात आरोपी असलेल्या अर्चना कुटे मात्र अद्यापही पोलिसांना सापडलेल्या नाहीत.

Tagged