स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड दि.14: पोलीस अधीक्षक बीड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्हयात अवैधरित्या गावठी पिस्टल जवळ बाळगणारे इसमाविरुध्द कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन पोलीस उप-निरीक्षक खटावकर यांचे पथकास सुचना दिल्या. पेठ बीड ठाण्यात दाखल आसलेल्या कलम 307, 143, 147, 148, 149 भादविमधील आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी अभिषेक डोंगरे हा तेलगांव नाका, बीड येथे उभा आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व स्टाफ यांनी तात्काळ तेलगांव नाका, बीड येथे जाऊन सदर इसमांस ताब्यात घेवुन त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अभिषेक विश्वास डोंगरे (वय 23 वर्ष रा. इमामपुर रोड, बार्शी नाका, बीड) असे सांगितले. त्याचे ताब्यातुन दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस व एक खाली केस असा एकुण किंमती 82 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन त्याचेवरती पोलीस स्टेशन पेठ बीड गुरनं 215/2024 कलम 3/25 भाहका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक श्रीराम खटावकर, पोह.मनोज वाघ, पोह.अशोक दुबाले, पोना.विकास वाघमारे, पोना.सोमनाथ गायकवाड, पोकॉ.सचिन आंधळे, पोकॉ.अश्विनकुमार सुरवसे, पोकॉ.नारायण कोरडे, पोकॉ.सुनिल राठोड सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.