–पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आवाहन
बीड दि.23 : सध्या बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, वडवणी, शिरूर आदी तालुक्यात ड्रोन उडवले जात आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी खुलासा केला असून चोरट्यांचा आणि या ड्रोनचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे. हे ड्रोन कुणाचे आहेत, कशासाठी उडवले जात आहेत याबाबत लवकरच खुलासा केला जाईल अशी माहिती बारगळ यांनी शुक्रवारी (दि.23) पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची उपस्थिती होती.