CHEDCHHAD, ASHLIL CHALE, VINAYBHANG

शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बीड

परळी : शहरातील बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या नराधम शिक्षकाने 12 वर्षीय बलिकेचा निरागसपणाचा फायदा घेत विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार परळी शहरात मलिकपुरा भागात असलेल्या बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षक साजीद सलीम शेख यांनी शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या ड्रेस मध्ये हात घालुन पाठीवर व बगलात हात फिरवला तसेच ती वाचन करीत असताना तिचे बोटावर बोट ठेवुन हात पकडुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला.शिक्षण क्षेत्रात एका बाजूला गुड टच-बॅड टच चे धडे देणाऱ्या शिक्षकांकडूनच या पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस बॅड टच करण्याचा किळसवाणा प्रकार परळी शहरात घडला आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडील यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुरन 141/2024 कलम 74, 75, 79 भारतीय न्यास संहिता व कलम 8, 12 पोक्सो अधिनियम 2012 नुसार शाळेतील क्रूर शिक्षक साजिद सलीम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अंबाजोगाई येथील पिंक पथक हे करत आहे.

Tagged