बस-टेम्पोचा भीषण अपघात ; वाहकासह पाच जणांचा मृत्यू!

बीड


बीड दि.20: अंबड तालुक्यातील सुखापुरीपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर जालना बीड रोडवर शुक्रवारी (दि.20) सकाळच्या सुमारास कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसच्या वाहकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Bus tempo accident)

बंडू बारगजे असे मयत बस वाहकाचे नाव आहे. तर बस चालक गोरख खेत्रे यांच्यासह अनेकजण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान जालना बीड रोडवरील मठ तांडा येथे बीड आगारातील गेवराई – जालना बसचा आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. यात अनेकजण जखमी असून काहींची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. भीषण अपघातातमुळे जालना बीड रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Tagged