बीड

एसडीएम कार्यालयातील कर्मचाऱ्यावर एसीबीची कारवाई

By Keshav Kadam

September 27, 2024

बीड दि. 27 : प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी बीड उपविभागीय कार्यालयातील तलाठ्याने स्वतःसाठी दोन हजार व उपविभागीय अधिकारी मॅडम यांच्यासाठी पाच हजार अशी सात रुपयाची लाजेची मागणी केली. ही लाच रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टीमने शुक्रवारी (दि.27) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रंगेहात पकडले.=या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

निलेश धर्मदास मेश्राम (वय 31,व्यवसाय-नोकरी, तलाठी- सजा (मांजरसुंबा ) प्रतिनियुक्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय, बीड उपविभाग, ता,जि, बीड) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. बीड येथील कौटुंबिक न्यायालय, जुनी इमारत उपविभागीय अधिकारी कार्यालय रूम क्रमांक (109) येथे तक्रारदार यांचे गेवराई हद्दीत राक्षसभुवन रोडवर जय हिंद नावाचे हॉटेल आहे. सदर हॉटेलवर दारूबंदी विभागाकडून व गेवराई पोलीस ठाण्याकडून मुं.दा.का 65 (ई) प्रमाणे दोन गुन्हे दाखल होते, त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी त्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथून मु. दा.का. कलम 93 (ब) प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी नोटीसबजावण्यात आली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने बंधपत्र लिहून घेण्यासाठी व सदर प्रकरण बंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे आलोसे यांनी स्वतःसाठी डोंबहजार रुपये व उप विभागीय दंडाधिकारी मॅडम यांच्यासाठी पाच हजार रुपये अशी एकूण सात हजार रुपये लाचेची मागणी पंच साक्षीदार समक्ष करून सदर लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली. मेश्राम यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर टीमचे पोलीस निरीक्षक हरीदास डोळे, वाल्मीक कोरे, पोलीस हवालदार साईनाथ तोडकर, पोअं राजेंद्र नंदिले , चालक सी. एन. बागुल यांनी केली.