बीड

आष्टी पोलीस उपाधीक्षक म्हणून हानपुडे यांनी स्वीकारला पदभार

By Keshav Kadam

October 07, 2024

बीड दि. 7 : आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले अभिजित धाराशिवकर यांची बदली झाल्याने आयपीएस कमलेश मीना यांच्याकडे पदभार होता.

नांदेड जिल्ह्यातून नुकतेच बीड जिल्ह्यात आलेले पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी आष्टी पोलीस उपाधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केलेले असल्याने त्यांना बीडचा अनुभव आहे.