बीड

धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या वाहनाला ट्रॅव्हल्सची धडक

By Balaji Margude

October 17, 2024

परळी : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटे 4.30 ला अपघात झाला. कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या कारने जात होत्या. त्यांच्या कारने पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मुंडे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने मुंडे यांना मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. राजश्री मुंडे या किरकोळ जखमी आहेत. याबाबत अधिक तपास सुरु आहे.