Sharad Pawar

बीड

शरद पवारांचे बीडमधील सर्व उमेदवार ठरले

By Balaji Margude

October 19, 2024

संभाव्य यादी आली बाहेर

दि.19 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील सर्व उमेदवार ठरले आहेत. शरद पवारांच्या पक्षाकडून कोणत्या मतदारसंघातून कोणते उमेदवार रिंगणात उतरवायचे आहेत याविषयीची संभाव्य यादी आज इलेक्ट्रॉनिक माध्यामांमधून प्रकाशीत केली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात पवारांनी उमेदवार फायनल केल्याचे दिसत आहे.बाहेर आलेल्या या संभाव्य यादीनुसार बीडमधून विद्यामन आ. संदीप क्षीरसागर sandeep kshirsagar यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या ठिकाणाहून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर jaidatta kshirsagar इच्छूक होते. केजमधून माजी आ. पृथ्वीराज साठे iruthviraj sathe यांचे नाव आले आहे. येथून माजी आ. संगीता ठोंबरे, अंजली घाडगे यांची नावे चर्चेत होती. माजलगावातून रमेश आडसकर ramesh adaskar यांचे नाव दिसत आहे. या ठिकाणी मोहन जगताप, mohan jagtap माजी आ. राधाकृष्ण होके पाटील, नारायण डक narayan dak यांची नावे चर्चेत होती. आष्टी मतदारसंघातून अनपेक्षीतपणे माजी आ. भीमराव धोंडे यांचे नाव दिसत आहे. बहुतांश हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्याने येथून या पक्षाकडून आ. बाळासाहेब आजबे यांचे नाव फायनल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे माजी मंत्री भाजपाचे नेते सुरेश धस sursh dhas यांनी काल रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. आता इथून धस अपक्ष उभे राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेवराईमधून भाजपाचे विद्यमान आ. लक्ष्मण पवार laxman pawar हे शरद पवार यांच्या पक्षात जाणार होते. त्यांचेही नाव तुतारी चिन्हासाठी फायनल झाल्याचे दिसत आहे. तर बहुचर्चित असलेल्या परळीतून तुतारी चिन्हावर राजाभाऊ फड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे.

बीडमधील सहापैकी पाच लढती तुतारी विरूध्द घड्याळबीड जिल्ह्यातील सहा पैकी पाच मतदारसंघात तुतारी विरूध्द घड्याळ अशी लढत पहायला मिळणार आहे. त्यात बीड, माजलगाव, परळी, गेवराई आणि आष्टीचा समावेश आहे. एकमेव केज मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आ. नमिताताई मुंदडा यांना भाजपाचे चिन्ह असणार आहे. त्यांची लढत तुतारीच्या उमेदवाराबरोबर होत आहे.

गेवराई उबाठा गटाला नाहीगेवराई विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. लक्ष्मण पवार शरद पवार गटात येत असल्याने इथून उध्दव ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता दिसत आहे. वेळप्रसंगी ते अपक्ष मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

माजलगावात घड्याळीचा उमेदवार कोण?माजलगाव मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आ. प्रकाश सोळंके यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे समजत आहे. परंतु आपण आता राजकारणातून निवृत्ती घेत असून आपले राजकीय वारसदार जयसिंह सोळंके असतील असे आ. प्रकाश सोळंके यांनी काही दिवसांपुर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे थोडासा संभ्रम मतदारसंघात आहे. इथून तुतारीच्या तिकिटासाठी आग्रही असलेले मोहन जगताप अपक्ष राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या सारख्या प्रभावी उमदेवाराला मनोज जरांगे पाटील समर्थन देण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

अशी आहे शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादीइस्लामपूर- जयंत पाटीलतासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटीलशिराळा- मानसिंग नाईकउत्तर कराड- बाळासाहेब पाटीलकोरेगाव- शशिकांत शिंदेफलटण – दीपक चव्हाणमाण खटाव- प्रभाकर देशमुखशिरुर- अशोक पवारजुन्नर- सत्यशील शेरकरइंदापूर- हर्षवर्धन पाटीलआंबेगाव- देवदत्त निकमवडगाव शेरी- बापू पठारेदौंड- रमेश आप्पा थोरातमाळशिरस- उत्तमराव जानकरकर्जत जामखेड- रोहित पवारकाटोल- अनिल देशमुखविक्रमगड- सुनील भुसाराघनसावंगी – राजेश टोपेमुंब्रा- जितेंद्र आव्हाडजिंतूर- विजय भांबळेअहेरी- भाग्यश्री अत्रामसिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणेउदगीर- सुधाकर भालेरावघाटकोपर पूर्व- राखी जाधवबीड- संदीप क्षीरसागर परळी- राजाभाऊ फडगेवराई – लक्ष्मण पवारआष्टी- भीमराव धोंडेकेज- पृथ्वीराज साठेमाजलगाव- रमेश आडसकरराहुरी- प्राजक्त तनपुरेदेवळाली- योगेश घोलपदिंडोरी – गोकुळ झिरवाळमुक्ताईनगर – रोहिणी खडसेजामनेर- गुलाबराव देवकरअकोला- अमित भांगरेपारनेर- राणी लंकेखानापूर – सदाशिव पाटीलचंदगड- नंदाताई बाभूळकरइचलकरंजी- मदन कारंडे