Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजलगाव, परळीचे उमेदवार जाहीर

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा राजकारण

रमेश आडसकर यांनाच हाबाडा

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अखेर माजलगाव व परळीचे उमेदवार ठरले. माजलगावातून मोहन बाजीराव जगताप तर परळीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच त्यांच्याच पक्षाकडून माजलगावातून राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतरही प्रकाश सोळंके यांना उमेदवारी मिळालेली आहे. या दोन्ही उमेदवारांविरोधात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. परळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी भाजपतून शरद पवार गटात प्रवेश केलेले रमेश आडसकर यांना माजलगावमधून उमेदवारी निश्चित मानली जात असताना अनपेक्षितपणे मोहन बाजीराव जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे शरद पवारांनी रमेश आडसकरांना हाबाडा दिल्याची चर्चा होत आहे.

महायुतीचा आष्टीच्या जागेचा तिढा सुटला?
महायुतीचा आष्टीच्या जागेचा तिढा सुटला असून भाजपकडून याठिकाणी सुरेश धस यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून धसांना उमेदवारी मिळाल्यास बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Tagged