sandip kshirsagar, vina anudanit shala kruti samiti,

बीड

बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या घरापुढे आंदोलन

By Balaji Margude

June 17, 2020

echo adrotate_group(3);

बीड,  दि.17 : मागील चार वर्षापासून फक्त वीस टक्के 20 टक्के अनुदान घेत असलेल्या सर्व शाळांना 1 एप्रिल 2019 पासून प्रचलीत नियमाप्रमाणे पुढील अनुदानाचा वाढीव टप्पा द्या, अनुदान घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना तत्काळ 20 टक्के अनुदान सुरू करून अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची यादी निधीसह घोषित करा. या प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी आज राज्यभर विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्याच्या घरापुढे ठिय्या आंदोलन करण्यात आले.echo adrotate_group(7);

बीड जिल्ह्यामध्ये सर्वच आमदारांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आले. बीड विधानसभेचे सदस्य संदीप क्षीरसागर यांना बीड तालुका विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन आमच्या मागण्या शासनापुढे मांडून मंजूर करून घ्याव्यात अशी विनंती यावेळी करण्यात आली.echo adrotate_group(5);

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आज  विनाअनुदानित शिक्षकांना 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार वेतनाचे आदेश काढावेत. सध्या 20 टक्के अनुदान घेत असलेल्या सर्व शाळांना शासन निर्णयाप्रमाणे 1 एप्रिल 2019 पासून प्रचलित नियमानुसार पुढिल वाढिव अनुदानाचा टप्पा द्यावा. अनुदान घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना शासन निर्णयाप्रमाणे 1 एप्रिल 2019 पासून 20 टक्के अनुदान द्यावे. अघोषित असणार्‍या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा निधीसह घोषित कराव्यात. तसेच 20 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांमधील शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यासाठी संपूर्ण राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांच्या घरासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. बीड विधानसभेचे सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या घरासमोर आज सोशल डिस्टंसिंग पाळून धरणे आंदोलन करून निवेदन दिले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर यांनी तुमचा प्रश्न गंभीर आहे. मागच्या शासनाने तुम्हाला धोका दिला आहे. आमचा शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. तुमच्या रास्त मागण्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन आ. क्षीरसागर यांनी यावेळी दिले दिले. जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा मी तुमच्या सोबत असेल असेही यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले.echo adrotate_group(9);

यावेळी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे औरंगाबाद विभाग प्रमुख जितेंद्र डोंगरे, बीड तालुका अध्यक्ष भागवत यादव, आत्माराम वाव्हळ, गणेश गुजर, प्रतिभा आर्सुळ, जयदत्त सुद्रुक आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. echo adrotate_group(10);