yogesh kshirsagar

बीड

बीडमधून महायुतीकडून डॉ. योगेश क्षीरसागर फायनल

By Balaji Margude

October 29, 2024

बीड, दि.28 : बीडमध्ये महायुतीकडून डॉ. योगेश क्षीरसागर dr yogesh kshirsagar यांचे नाव अंतिम झाले आहे. डॉ. क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकिट देण्यात आले आहे.बीडची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापैकी कोणाकडे ठेवायची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर रात्री एकच्या सुमारास या जागेचा तिढा सुटला. त्यानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आली आहे. त्यानुसार आता डॉ. योगेश क्षीरसागर हेच या जागेवरून लढणार आहेत. पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे हे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी शेवटपर्यंत आग्रही होते. काल शिंदे गटाकडे गेलेली जागा मुंडे बहिण भावाने योगेश क्षीरसागर यांच्यासाठी अक्षरशः खेचून आणली.