loksabha election 2024

केंद्रात मंत्रिपदाची चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

By Karyarambh Team

October 29, 2024

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी मिळणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवासंपासून सुरू आहे, याबाबत त्यांनी आता मोठा खुलासा केला आहे.

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी मिळणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवासंपासून सुरू आहे. यावर आता फडणवीस यांनीच मोठा खुलासा केला आहे. मी नेहमीच सांगतो जेव्हा दिल्लीच्या पत्रकारांकडे काही बातम्या  नसतात तेव्हा ते अशा बातम्या करतात, असं होत नाही. कोणतीही अशी ऑफर नाही. भाजपमध्ये व्यक्ती किंवा नेते निर्णय घेत नाहीत तर पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेते असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.