बीड,दि.30 : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेले डॉ. योगेश क्षीरसागर YOGESH KSHIRSAGAR यांनी आजपासून आपल्या निवडणूक रणनितीची एक एक पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. आजच त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर लागलीच त्यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात इनकमिंग करीत पक्ष प्रवेशाचा श्रीगणेशा करून टाकला.
आज उमेदवारी अर्जाची छाननी होती. छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे कामाला सुरूवात केली. सर्व प्रथम डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण गडावरील नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच, शहरातील कंकालेश्वर मंदिर, शहेंशावली दर्गा, खंडेश्वरी मंदिर, राजुरी न. येथील नवगण गणपती या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, संत गाडगे बाबा, क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, वसंतराव नाईक पुतळा भगवान बाबा चौक, वीर सावरकर, यशवंतराव चव्हाण, स्व.द्वारकादास मंत्री या महापुरुषांसह छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण परिसरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन देखील केले. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांसह कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. त्यांच्या उमेदवारीचे सर्व स्तरातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. बीड तालुक्यातील पिंपळगाव (मजरा) येथील माजी सरपंच श्रीराम डुकरे, कल्याण गाडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे स्वागत करत पक्ष संघटन वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.