प्रतिनिधी । आंतरवाली सराटीआंतरवाली सराटी, दि.3 : मी नवीन आहे. त्यामुळे जागांबाबत वेळ लागतोय. एकदोन प्रश्न किचकट आहेत. काल मी सर्वांना सांगितलं आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचं मी काही सांगत नाही. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर मान टाकू शकतो. पण आमचे मराठे 100 टक्के एकत्र राहणार आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE PATIL यांनी केला. आम्हाला फडणवीस यांनी बेजार केलं म्हणून लढत आहोत. आम्हाला नाद नाही. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे. त्यालाच मराठा म्हणतात, असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.जरांगे पाटील म्हणाले, आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत. आपल्याला आधार पाहिजे. राजकारणाचं वेड लागू देऊ नका. आमदार, खासदार होण्याची स्वप्न पाहू नका. एखाद्या जिल्ह्यात जागा दिली तर पूर्ण जिल्ह्याने काम करायचं. आणि गुलालच घेऊनच यायचं. एक एक का होईना पण तो आधार होईल. तो विधानसभेत भांडेल. आपले मुद्दे मांडेल. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही. निवडून येणार्या जागांवर चर्चा करू. मुस्लिम आणि आंबेडकरी नेते येतील त्यांच्या जागा सांगतील. त्यावर चर्चा करू. कमीत कमी 10 ते 15 आपल्या हक्काचे आहेत, हे म्हणायला होईल. 200 लडून पडण्यात अर्थ नाही. आपल्याला शत्रू खूप आहेत, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे. त्यांना चार उंबरे घर हक्काचं करायचं आहे. मराठ्यांचे 150 ते 200 आमदार आहेत. पण आम्हाला आधार नाही. आम्हाला दार उघडं नाही. आम्हाला आमचा हक्काचा आमदार पाहिजे. आमचा म्हणून काम सांगायचं आहे. माझी काही इच्छा नाही. मला यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी एक तरी माणूस द्यायचा आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका. जात बघा. खूप जण आले. वगैरे वगैरे भरपूर नेते भेटायला आले. सर्वच पक्षाचे लोक आले होते, असे त्यांनी सांगितले.समाजासाठी आपल्याला 10 ते 20 आमदार पाठवायचे आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मला राजकारणाची व्याख्या बदलायची आहे. मला राजकारणाची सामाजिक व्याख्या करायची आहे. माझी एकतर इच्छा नव्हती राजकारणात जायची. ठराविक मतदार संघात लढवू आणि महाराष्ट्रातील सगळ्यांनी ताकद लावायची आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
केज आणि बीड लढणारबीड जिल्ह्यातील केज या राखीव जागेवर कोणाला तरी पाठींबा द्यायचा मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराधीन आहे. तर बीड विधानसभेची जागा देखील जरांगे पाटील लढणार असल्याचे समजत आहे.तर जालना जिल्ह्यातील मंठा परतूर ही विधानसभेची जागा लढवण्यात येणार आहेत. संभाजीनगरमधील फुलंब्रीची जागा लढवली जाणार आहे. गंगापूरमध्ये पाडण्याची भुमिका घेतली जाईल तर कन्नड लढवणार आहेत. औरंगाबाद पश्चिममध्ये कोणाला तरी पाठींबा दिला जाईल असे संकेत मिळत आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीची जागा पाडण्यात येणार आहे असे समजते.
जिथे एकापेक्षा जास्त मराठे उभे तिथे उमेदवार नाहीज्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त मराठे एकसमोर एक उभे आहेत तिथे जरांगे पाटील उमेदवार देण्याची शक्यता नाही. तिथला निर्णय स्थानिक लोकांवर सोडून देण्यात येणार आहे. पण जिथे मराठा उमदेवार निवडूनच येऊ शकतो तिथे थेट उमेदवार द्यायचा अशी भुमिका जरांगे पाटलांची आहे. शिवाय ज्या ठिकाणी कमळाचे चिन्ह आहे त्या ठिकाणी तो उमदेवार पाडण्याची भुमिका देखील जरांगे पाटील घेण्याची शक्यता आहे. सायंकाळी पाच वाजता यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल्.