बीड

क्षीरसागरमुक्त बीड करण्यासाठीएकत्र बसा आणि चिठ्ठी काढा !

By Keshav Kadam

November 18, 2024

ज्योती मेटे, अनिल जगतापयांना कुंडलिक खांडे यांचे आवाहनबीड दि. 18 : क्षीरसागर मुक्त बीड करण्यासाठी सगळ्यांची इच्छा आहे, यासाठी मी सुद्धा पुढाकार घेत असून अपक्ष उमेदवार असलेल्या डॉ.ज्योतीताई मेटे, अनिल जगताप यांनी आज एकत्र येऊन पत्रकार परिषद घ्यावी, त्याठिकाणी सर्वांच्या नावाने चिठ्ठी टाकून एक चिठ्ठी काढावी. ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. तरच क्षीरसागर मुक्त बीड होईल. कुंडलिक खांडे यांनी केलेल्या या आवाहनाला ज्योतीताई मेटे, अनिल जगताप काय प्रतिसाद देतात याकडे बीड मतदार संघाचे लक्ष लागले आहे. यावेळी सभेसाठी छत्रपती संभाजी महाराज, दीपक केदार, गेवराईच्या उमेदवार पूजा मोरे, रामहरी मेटे आदींची उपस्थिती होती.