DEVENDRA FADANVIS

बीड

गेवराईचे माजी आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला!

By Keshav Kadam

December 03, 2024

बीड दि. 3 : गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले आहेत. लक्ष्मण पवार हे गेवराई विधानसभा मतदार संघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी देऊनही पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. ऐन निवडणुकीत भाजपला सोडून अपक्ष निवडणूक लढविणारे लक्ष्मण पवार पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेल्याने लक्ष्मण पवार यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का? पुन्हा पवार काही राजकीय भूमिका घेणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.