बीड

अंबाजोगाई शहरात दहा लाखांचा गुटखा पकडला!

By Keshav Kadam

December 03, 2024

–एसपींच्या विशेष पथकाचे प्रमुख बाळराजे दराडे यांची कारवाईबीड दि.3 : पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई शहरात गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी (दि.3) सायंकाळी सातच्या सुमारास धाड मारली. यावेळी 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला.

गणेश बिडवे, किरण रविंद्र शेटे अशी गुटखा व्यापार्‍यांची नावे आहेत. त्यांनी अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजनच्या गोदामात गुटख्याचा साठा करुन ठेवला होता. याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख बाळराजे दराडे यांना मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाने या गोदामावर धाड टाकली. यावेळी रजनीगंधा, आरएमडी, विमल, गोवा, बाबा या कंपीनचा 10 लाख 67 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहायक निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे, यांनी केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.