महामार्ग पोलीस गेवराई येथे गणेश मुंडेंची नियुक्ती!

बीड


बीड दि. 4 : बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेतून धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस म्हणून सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांची बदली झाली होती. 3 डिसेंबर रोजी गणेश मुंडे (ganesh munde) यांची पुन्हा बीड जिल्ह्यात बदली झाली आहे. महामार्ग पोलीस गेवराई येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विनंतीवरून त्यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश अरविंद साळवे पोलीस अधीक्षक (मुख्यालय), अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) मुंबई यांनी काढले आहेत. गणेश मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत असताना तसेच पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक म्हणून मोठ्या कारवाया केलेल्या आहेत.

(api ganesh munde)

Tagged