बीड

बीडमध्ये मध्यरात्री जुन्या वादातून गोळीबार ; एकजण गंभीर जखमी!

By Keshav Kadam

December 13, 2024

बीड दि. 13 : बीड जिल्ह्याचा बिहार झालाय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मस्साजोग येथे सरपंचाची क्रूरतेने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार (fire news) करण्यात आला. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे. (Beed fire news)

विश्वास दादाराव डोंगरे (रा.इमामापुर रोड, बीड) असे जखमीचे नाव आहे. डोंगरे व आठवले यांच्यात जुना वाद आहे. यापूर्वी दोन गटात मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी (दि.13) मध्यरात्री दोनच्या सुमारास अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या इमामपुर रोडवरील घरात घुसून गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये डोंगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. प्रकरणाचा अधिक तपास पेठ बीड (peth beed police) पोलीस करत आहेत.

जबाब घेण्यासाठी पथकछत्रपती संभाजीनगरलाघटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तातडीने पेठ बीड पोलिसांना गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेचे आदेश दिले. त्यानुसार पेठबीड पोलीस ठाण्यातील एक पथक जखमीचा जबाब घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे पहाटेच रवाना झाले आहे.