बीड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील विष्णू चाटे अटक!

By Keshav Kadam

December 18, 2024

बीड दि.18 : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, तर फरार आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली होती. बुधवारी (दि.18) याच खून व खंडणी प्रकरणातील राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातूनच ताब्यात घेतले आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी कार्यारंभशी बोलताना दिली.