बीड

मस्साजोग हत्या प्रकरणातील निष्काळजीपणा एसपी बारगळ यांच्या अंगलट

By Keshav Kadam

December 20, 2024

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली करण्याचा घेतला निर्णयबीड दि.20 : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठी घोषणा करताना पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीडला कोणता अधिकारी येतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटत होते. याप्रकरणी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना सभागृहात दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला. तसेच याप्रकरणातील दोषींवर मोक्का लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर वाल्मिक कराड यांचा एका गुन्हयात सहभाग असून दुसऱ्या गुन्यातील सहभाग आम्ही तपासणार असल्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. दरम्यान पोलीस अधिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे आता त्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बीडला कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खाकीची भीती संपली –जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्या, गोळीबार अशा घटनांनी भीतीचं वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून खाकीचा धाक संपला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून गुंडाराज वाढला आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे बदली करणार असल्याचे सभागृहात सांगितले आहे.