बीड

महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर!

By Keshav Kadam

December 21, 2024

गृह व उर्जा खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेचप्रतिनिधी । बीडदि.21 ः महायुती सरकारचे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (दि.21) रात्री उशीरा मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गृहखाते मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खाते असणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता.

महायुती सरकारने जाहीर केलेले खातेवाटप..1 देवेंद्र फडणवीस- मुख्यमंत्री गृह, ऊर्जा2 एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री, नगरविकास3 अजित पवार – उपमुख्यमंत्री अर्थ4 चंद्रशेखर बावनकुळे – महसूल5 राधाकृष्ण विखे पाटील- जलसंधारण6 हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण7 चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण8 गिरीश महाजन- आपत्ती व्यवस्थापन9 गुलाबराव पाटील – जलसंधारण10 गणेश नाईक- वने11 दादा भुसे- शालेय शिक्षण12 संजय राठोड- पाणीपुरवठा13 धनंजय मुंडे- अन्न आणि नागरीपुरवठा14 मंगलप्रभात लोढा – कौशल्यविकास15 उदय सामंत- उद्योगमंत्री16 जयकुमार रावल- राजशिष्टाचार17 पंकजा मुंडे- पर्यावरण18 अतुल सावे- ओबीसी19 अशोक उईके- आदिवासी विकास20 शंभुराज देसाई- पर्यटन21 आशिष शेलार- माहितीआणि तंत्रज्ञान22 दत्तात्रय भरणे- क्रीडा23 आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण24 शिवेंद्रसिंह राजे भोसले- सार्वजनिक विकास25 माणिकराव कोकाटे- कृषिमंत्री26 जयकुमार गोरे – ग्रामीण विकास27 नरहरी झिरवळ- अन्न व औषध प्रशासन28 संजय सावकारे- वस्त्रोद्योग29 संजय शिरसाट- सामाजिक न्याय30 प्रताप सरनाईक- वाहतूक31 भरत गोगावले- रोजगार हमी32 मकरंद पाटील-33 नितेश राणे- मस्त्योद्योग34 आकाश फुंडकर- कामगार मंत्री35 बाबासाहेब पाटील- सहकार36 प्रकाश आबिटकर- कुटुंब कल्याण आणि आरोग्य

तर राज्यमंत्री म्हणून37 माधुरी मिसाळ -सामाजिक न्याय, वैद्यकिय शिक्षण38 आशिष जयस्वाल – अर्थ, कृषि39 पंकज भोयर- म्हाडा40 मेघना बोर्डीकर- आरोग्य व पाणीपुरवठा41 इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन

42 योगेश कदम – ग्रामविकास, पंचायतराज