kailas phad

हवेत गोळीबार करणार्‍या कैलास फडवर परळीत गुन्हा दाखल

बीड

परळी, दि.24 : परवानाधारक रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड kailas phad यांच्या विरोधात परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेत परळी शहर पोलिसांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून कैलास फड यांच्या विरोधात कलम 5/27, 30 आर्म्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला. दरम्यान शहरात कोणाकडे अवैध शस्त्र असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी देण्याचे आवाहन पो.नि.नाचन यांनी केले आहे.

शिवसेनेचे बीड येथील जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी फेसबूक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला होता. दिपावलीत शस्त्रपुजन करताना हा गोळीबार केल्याचे सांगितले जात असले तरी आता तपासात अनेक बाबी उघड होतील. गेल्या अनेक वर्षांपासून बीडमधील गुंडगिरी आणि तरुणाईचा प्रश्न खूपच जटील झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत कैलास फड याने केली होती मारहाण
विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी कैलास फड याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अ‍ॅड.माधव जाधव यांना परळीमध्ये मारहाण केल्याचा व्हिडिओ मतदानादिवशी व्हायरल झाला होता. आता, बंदुकीतून गोळी झाडल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तोही व्हिडिओ चर्चेत आला आहे.

Tagged