WALMIK KARAD

बीड

वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीकडे सरेंडर

By Balaji Margude

December 31, 2024

बीड, दि.31 : वाल्मिक कराड WALMIK KARAD यांनी आज पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात सरेंडर केले. दुपारी 12 वाजता त्यांनी ही शरणागती पत्करली.वाल्मिक कराड यांनी पवनचक्की कंपनीकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाईंड आहेत असा आरोप विरोधकांकडून होत आहे. दरम्यान खून प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.

कराड यांनी व्हिडिओ द्वारे मांडली बाजूवाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करण्यापुर्वी एक व्हिडिओ करून आपली बाजू मांडली. त्यात ते म्हणतात, केज पोलीस ठाण्यात जी खंडणीची फिर्याद दाखल झाली त्यात मी स्वतःला सीआयडी पोलीस पुणे यांच्याकडे स्वतःला अटक करून घेत आहे. मला जामीन मागण्याचा कायद्याने अधिकार असतानाही मी ही अटक करून घेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, जर मी या प्रकरणात दोषी असेल तर मला देखील कायद्याने शिक्ष व्हावी, अशी मागणी देखील वाल्मिक कराड यांनी या व्हिडिओद्वारे केली आहे.