–वर्षाचा शेवट एसीबीने लाचखोरावर कारवाई करून केला
बीड दि.1 : सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज होता. मात्र दुसरीकडे आपल्याच शाळेतील शिक्षकाकडून लाचेची मागणी करण्यात मुख्याध्यापक अन् लाचखोराला पकडण्यात बीडची एसीबी सज्ज होती. यात बीड एसीबीला यश आले असून वर्षाचा शेवटही लाचखोर मुख्याध्यापकावर कारवाई करून केला. वर्षभरातही बीड एसीबीने 29 सापळे रचून 58 आरोपींना गजाआड केले. ही वर्षातील शेवटची कारवाई मिळून 30 कारवाया वर्षात पूर्ण केल्या आहेत.
तक्रारदार हे शिक्षक आहेत. ते वैद्यकीय रजेवर होते. रजेवरुण हजर होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे त्यांनी अर्ज केला. त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी तुमचे मुख्याध्यापक सुर्वे यांच्याकडे अर्ज देण्यास सांगितला. तक्रारदार शिक्षक मुख्याध्यापक सुर्वे यांना भेटले असता त्यांनी सदर अर्जावरुन कर्तव्यावर हजर करुन घेण्यासाठी व गटशिक्षणाधिकारी यांची सही घेण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी केली . तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक सुर्वे यांनी तक्रारदार यांना पंचा समक्ष गटशिक्षण अधिकारी यांच्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले . त्यावरुन लोकसेवक सुर्वे यांचे विरुद्ध केज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक किरण बगाटे, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भारत गरदे, अविनाश गवळी, खरसाडे, पुरी यांनी केली.