प्रतिनिधी/बीड
दि.५. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्येच्या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले. केज पोलिस ठाण्यातील गैरकारभाराचेही दर्शन आणि घटनेला काही प्रमाणात हा कारभार कारणीभूत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत होती ते केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन विनंतीवरून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, तर पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची केज पोलीस स्टेशन प्रभारी, पोलीस निरीक्षक सय्यद मजहरअली अबुतालीब यांची नियंत्रण कक्षातून परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी, पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची नियंत्रण कक्षातून केज पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.
