पोलीस शिपायाची झाडालागळफास घेऊन आत्महत्या!

बीड

प्रतिनिधी/बीड दि.८. बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांने स्वत:हा राहत असलेल्या घराच्या बाजूला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

अनंत मारोती इंगळे (रा.कळंमआंबा ता.केज.जि बीड) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे.बीड पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई अनंत इंगळे यांची ड्युटी मुख्यालयात होती. (दि.८) त्यांनी सकाळी पोलीस वसाहतीतील राहत असलेल्या घराच्या बाजूला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Tagged