बीड

एसटीच्या धडकेत व्यायाम करणारे तिघे ठार!

By Balaji Margude

January 19, 2025

घोडका राजुरी फाट्याजवळील घटना

बीड, दि.१९. बीड-परळी महामार्गावर बीड-परभणी एसटी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. बीडजवळ घोडका राजुरी येथे (दि.१९.) सकाळी ही घटना घडली. अपघातात ठार झालेले तिघेही घोडका राजुरी येथील आहेत.

घोडका राजुरी येथील 5 जण सकाळी धावण्याचा सराव करत होते. त्यावेळी बीडवरून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बसने या पाच जणांना धडक दिली. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले. मात्र तिघे या अपघातात जागीच ठार झाले. तिन्ही मयत मुलांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृतांमध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय 20), विराट बब्रूवान घोडके (19) आणि ओम सुग्रीव घोडके (20) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती कळताच या तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.