बीड

खोक्याच्या प्रयागराजमधून मुसक्या आवळल्या

By Balaji Margude

March 12, 2025

बीड दि.१२.शिरुर कासार तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता-पुत्रास बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याने चक्क परिसरातील हरणांची शिकार करुन त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप झाला. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र खोक्या पोलिसांना गुंगारा देत होता. परवा त्याने काही वृत्तवाहिनींना प्रतिक्रिया दिली होती. यावरुन विधिमंडळात सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलीसांना का सापडत नाही?, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, आज सकाळी पोलीसांनी प्रयागराजमधून सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक केली आहे.