गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक वाढ

देश विदेश

देशातील रुग्णसंख्या गेली तीन लाखांच्यापुढे…

दिल्ली ः कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर दिसून आले आहे.

देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 881 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 66 हजार 946 वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 12 हजार 237 झाला आहे. हि अत्यंत चिंतेची बाब आहे.

याचबरोबर, गेल्या 24 तासांत 7 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 94 हजार 325 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरीचा रेट 52.95 टक्के इतका आहे. तर सध्या 1 लाख 60 हजार 384 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत

संपुर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. मोठे मोठे देश कोरोनामुळे हतबल झाले आहेत. यावर लस निघेपर्यंत काळजी अधिक घ्यावी लागणार आहे एवढे मात्र निश्चित.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged