देश विदेश

चीनच्या नाड्या आवळायला सुरवात; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार!

By Karyarambh Team

June 18, 2020

echo adrotate_group(3);

दिल्ली ः चीन भारताविरुद्धच्या आपल्या कुरघोड्या थांबवायला तयार नाही. लडाखच्या गलवान घाटीमध्ये झालेल्या झटापटीनंतर देशभरात संतापाची लाट आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.echo adrotate_group(7);

टेलिकॉम मंत्रालयाने बीएसएनएल, एमटीएनएलसह अन्य टेलिकॉम कंपन्यांना चीनकडून साहित्य खरेदी बंद करण्यास सांगितली आहे. एकट्या टेलिकॉम साहित्याचा बाजार 12 हजार कोटींचा आहे. यामध्ये चीनच्या साहित्याचा वापर 25 टक्के आहे.echo adrotate_group(8);

टेलीकॉम मिनीस्ट्रीने सांगितले की, 4जी अपग्रेडेशनचे जुने चिनी टेंडर आता रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता इथुन पुढे चीनच्या कंपन्या पुन्हा टेंडर प्रक्रियमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. बीएसएनएल हा चिनी झेड टी इ कंपनीचा मोठा गा्रहक आहे. झेड टी इ ही चीनची टेलीकॉम क्षेत्रातील आघाडीची साहित्य निर्माण करणारी कंपनी आहे.echo adrotate_group(9);

हा होणार याचा परिणाम…चीनच्या उत्पादनांवर बंदी आणण्याचा निर्णय महागडा ठरणार असल्याचे या क्षेत्रातील लोकांनी सांगितले. जर भारतीय कंपन्या चीन सोडून दुसर्‍या देशांमधून ही उपकरणे आयात करत असतील तर त्याचा खर्च 15 टक्क्यांनी वाढणार आहे. echo adrotate_group(10);