बीड दि.14 – बीड शहरापासून जवळच असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर येथील महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभूप्रेमींनी रात्रीतून पुतळा उभारण्यात आला आहे. दरम्यान बीड ग्रामीण पोलिसांना पहाटे याची माहिती मिळ्यानंतर धाव घेत पुतळा उभारणाऱ्या काही शंभूप्रेमींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म किल्ले पुरंदर येथे झाला. आज त्यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना बीड येथील महालक्ष्मी चौकात शंभूप्रेमींनी रात्रीतून त्यांचा पुतळा उभारला आहे. पुतळा उभारणाऱ्या काही शंभूप्रेमी यांना ताब्यात घेतल्याची माहिती असून महालक्ष्मी चौकात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.