vijay pawar, profassional coaching classes

प्रा.विजय पवारचे एक ना अनेक कारनामे आता उघड होणार, बीडच्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमा

बीड

बीड, दि.26 : येथील उमाकिरण शैक्षणिक संकुलमधील प्रोफेशनल क्लासचा profassional coaching class संचालक प्रा. विजय पवार vijay pawar याने अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत केलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीने बीडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळपासुनच बीड शहरातील बहुतांश क्लास बंद असल्याचे दिसून आले. शहरातील पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रा. विजय पवार याच्या क्लासेसच्या बाहेर प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक व्यक्तीकडून प्रा. विजय पवार यांच्या कृत्याबद्दल संतप्त भावना दिसून येत होती.

vijay pawar and sharad pawar
शरद पवार जेव्हा केव्हा बीडमध्ये यायचे त्यावेळी प्रा.विजय पवार ह्याला पहिल्या क्रमांकाचा पास दिला जायचा.

बीड शहरातील पांगरी रोडवर उमाकिरण नावाचे सर्वात मोठे शैक्षणिक संकूल आहे. या संकुलात आणि आसपास बीड शहरातील नामांकित क्लासेस आहेत. या सर्वच क्लासेस चालकांचं नेतृत्व प्रा.विजय पवार करत असतो. क्लासेसच्या बाबतीत कोणी काही तक्रार करायला गेले की हा विजय पवार त्या पालकांशी उध्दट वागतो. त्यांच्याशी अरेरावी करतो, प्रसंगी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासही तो मागे पुढे पाहत नव्हता. त्यामुळे विजय पवार यांच्या विरोधात कोणीच काही बोलू शकत नव्हते. त्यातच त्याला राजकीय वरदहस्त असल्याकारणाने तो त्याचा गैरवापर करीत असल्याच्या अनेक तक्रारी अलिकडच्या काळात ऐकायला मिळत होत्या. मात्र समाजाच्या व्यासपीठाचा वापर करीत आणि नेत्यांच्या आजुबाजुला राहून तो आपली सगळी काळी कारनामे झाकत होता.


शिक्षण क्षेत्रातून कमीत कमी
400 ते 500 कोटीची माया

प्रा. विजय पवार हा बीडच्या शिक्षण क्षेत्रातला दादा माणूस म्हणून संबोधला जात होता. त्यांच्या शहरात सर्वेश्वर मंदीर परिसर, आशा टॉकीज परिसर आणि उमाकिरण संकुलात प्रोफेशनल, गालीब, नावाचे कोचिंग क्लासेस आहेत. याशिवाय बार्शी रोडवर संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आहे. बीड शहराच्या बाहेर अनेक तालुक्यात आणि जिल्ह्यात त्याचं कोचिंग क्लासेसचं जाळं विणलेलं आहे. या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रा. पवार हा चार विषयासाठी वनटाईम फी भरल्यास 72 हजार रुपये आकारात होता. त्याच्याकडे एकूण 5000 च्या आसपास विद्यार्थी क्लास करीत होते. म्हणजेच तो वर्षाकाठी एकट्या बीडमध्ये 36 कोटी रुपयांची फीस जमवत होता. बीड शहराच्या शिक्षण क्षेत्रात त्याचीच मोनोपल्ली चालत होती. इंग्लिश स्कुल चालकांना देखील तो गैरकृत्यांमध्ये मदत मिळवून द्यायचा. अनेक शिक्षकांना त्याने वेठबिगारासारखे राबवून घेत असे. शिवाय शहरातील एखादा क्लासचालक स्वतःचे क्लास वेगळ्या ठिकाणी चालवत असेल तर तो त्यालाही ऐनकेनप्रकारे त्रास देऊन त्यांच्यात बळजबरीने पार्टनरशीप करीत असल्याचे आता काही क्लास चालक दबक्या आवाजात बोलत आहेत.

vijay pawar and manoj jarange patil
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील प्रत्येक दौर्‍यात प्रा. विजय पवार असायचा. किंबहुना बीड शहरातील कार्यक्रमाच्या सुत्र संचलनाची जबाबदारी देखील त्याच्याकडे असायची.

समाजाच्या नावाने दुकानदारी

प्रा.विजय पवार हा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत होता. त्यातून तो समाजाच्या आड आपले धंदे लपवत होता. दुकानदारी करीत होता. एकाही मराठा समाजाच्या गरीब मुला-मुलीसाठी शिक्षणात त्याने कधी एक रुपयांची सवलत दिलेली नाही. स्थानिक लेवलवर त्याने आ. संदीप क्षीरसागर यांचा आश्रय घेतला होता. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे तो सुत्रसंचालन करायचा. आ. क्षीरसागर यांच्या दैनंदिन कारभारात देखील त्याची मोठी लुडबूड होती. त्यामुळे आ. संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते देखील त्याच्यावर प्रचंड नाराज होते.

vijay pawar-bajrang sonwane

मनोज जरांगे पाटील, शरद पवार, जयंत पाटील,
बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे फोटो व्हायरल

प्रा. विजय पवार हा पूर्णवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. बीडमधील शरद पवारांच्या सभेचं नियोजन आणि सुत्रसंचालन त्याच्याकडेच असायचे. त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीचे मोठे पदाधिकारी आले की तो त्यांच्या गाडीत बसायचा. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे त्याचे अनेक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांनाही धमकावण्याचे प्रकार

प्रा. विजय पवार याचे अलिकडच्या दोन वर्षात बीडमध्ये प्रचंड प्रस्थ वाढले होते. त्याने काही सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना धमकावून त्यांच्याकडे खंडणी मागण्याचे देखील प्रकार केले असल्याच्या तक्रारी आता अधिकारी, कर्मचारी दबक्या आवाजात करीत आहेत.

काय आहे पीडित मुलीची तक्रार


पीडित अल्पवयीन मुलगी ही 17 वर्षाची आहे. बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि.नं 354/2025 भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 76, 78, 3(5) सह कलम 8, 9, 10, 12 पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीत पीडितेनं गंभीर आरोप केले आहेत. आरोपी प्रशांत खाटोकर आणि प्रा. विजय पवार हे पीडितेला क्लास रुममध्ये एकटी गाठून किंवा केबीनमध्ये बोलावून गूड टच बॅड टच करत होते. किस घेत होते, असा आरोप केला आहे.

इंग्लीश स्कुलमध्येही गैरप्रकार?

प्रा. विजय पवार ह्याच्याबद्दल किंवा त्याच्या क्लासच्या बाबत कोणीच चांगले बोलत नाही. त्याच्या अखत्यारित असलेल्या अनेक इंग्लिश स्कूलमध्येही काही महिला शिक्षकांनी त्यांच्याविरोधात यापुर्वी तक्रारी केल्या होत्या. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने तो कुणालाच भीक घालत नव्हता. त्यामुळे त्याचा त्रास महिला शिक्षीका आणि काही विद्यार्थीनी निमूटपणे सहन करीत असल्याचे आता बोलले जातेय. कुणी तक्रार करायला गेले तर तो जास्तीच त्रास देत असे.

umakiran shaikshanik sankul beed
हेच ते उमाकिरण शैक्षणिक संकूल. जिथे अल्पवयीन पीडित मुलीसोबत गैरवर्तन करण्यात आले.

गैरप्रकाराच्या तक्रारी करण्यासाठी पुढे यावं

दरम्यान ज्या महिला आणि मुलींसोबत प्रा. विजय पवार याच्या किंवा इतर क्लासमधून काही गैरप्रकार घडले असतील तर पीडित महिला मुलींनी समोर येऊन आपला जवाब शिवाजीनगर पोलीसांकडे नोंदवायला हवाय.

सीसीटीव्ही बंद

दरम्यान हे गैरकृत्य झाले त्या ठिकाणचे 13 जूनआधीपासून सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील लपवा-छपवी करण्यासारख्या अनेक बाबींना दुजोरा मिळत आहे.

Tagged