vijay pawar, profassional coaching classes

बीड

प्रा.विजय पवार, प्रशांत खाटोकरलाएलसीबीने घेतले ताब्यात!

By DHANANJAY JOGDE

June 29, 2025

बीड : बीड शहरातील नामांकित प्रोफेशनल क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याच्या प्रकरणात पोस्को गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपासून फरार असलेले प्रा. विजय पवार व खाटोकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे बीड तालुक्यातील मांजरसुंभा परिसरातून सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांना सफारी गाडीतून हे दोघे पुढे जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ पथक रवाना करून दोघांना अटक केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर बीड शहरात आणि जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. प्रा. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्कोनुसार गुन्हा दाखल होता. बिडकरांनी या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी केली असून, शिक्षणाच्या मंदिरात असा घृणास्पद प्रकार घडल्याने समाजमन हादरून गेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.