बीड

प्रा.विजय पवार, प्रा.खाटोकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ!

By dhananjay jogadedj

July 01, 2025

प्रतिनिधी | बीड

उमाकिरण क्लासेसमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांची पोलीस कोठडी पाच जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सोमवारी (दि. १ जुलै) आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर कोठडी वाढीचा निर्णय घेण्यात आला.या प्रकरणात यापूर्वी फक्त तीन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर संशयाची सुई फिरली होती. यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर सोमवारी न्यायालयाने कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ मंजूर केली.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी प्रशांत खाटोकर यास जिल्हाबाहेर घेऊन जाण्यासाठी एका पर जिल्ह्यातील व्यक्तीने मदत केली. त्यामुळे तिसरा आरोपी म्हणून त्याचा सहभाग निष्पन्न झाला होता. मात्र पोलिसांनी त्यास नोटीसवर सोडल्याची माहिती आहे.