विजय पवार, खाटोकर यांना मोठा दिलासा !

क्राईम

बीड दि.17 : बीड जिल्ह्यात गाजलेल्या आणि जनतेच्या संतापास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी विजय पवार व प्रशांत खाटोकर (उमाकिरण संकुल, बीड) यांना गुरुवार, 17 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती शिंदे यांनी जामीन मंजूर केला आहे. beed crime news

या गुन्ह्याने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, अश्लील फोटो काढत विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघे न्यायालयीन कोठडीत होते. जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींना जामीन मिळावा अशी मागणी केली. त्यांना अ‍ॅड. गणेश कोल्हे, अ‍ॅड. संज्योत महाजन, अ‍ॅड. योगेश सुरवसे, अ‍ॅड.अभिजीत चौरे, अ‍ॅड.धनराज जाधव व अ‍ॅड.सोनवणे यांनी सहकार्य केले.

Tagged