krashi dukan

माजलगावच्या तीन कृषि सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द

बीड शेती

  माजलगाव, दि.18: माजलगाव शहरातील तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने अनियमितता आढळल्याने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड यांनी रद्द केल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी दिली.

     माजलगाव तालुक्यातील काही कृषि सेवा केंद्राची तपासणी खत निरीक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती यांनी तपासणी केली असता त्यांना काही त्रुटी आढळन आल्या यामध्ये रासायनीक खताचा साठा फलक ग्राहाकास स्पष्ट दिसेल अस्या ठिकाणी न लावने, विक्री बिला मध्ये आवश्यक सर्व मजकुर तसेच विक्रेता व खरेदिदारीची स्वाक्षरी नसणे, साठा पुस्तक प्रमाणीत नसने, साठा पुस्तक जुळत नसने, नोंदनी प्रमाणपत्रा मध्ये दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेल्या उत्पादकाच्या स्त्रोतांचा समावेश नसने या बाबीच्या त्रुटी आढळुन आल्यामुळे सदरील कृषि सेवा केंद्रावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना शिफारस करण्यात आली होती यांमध्ये सुनावणी घेऊन सुमित अ‍ॅग्रो एजन्सी, मे.मोरेश्वर बीज भांडार, सदगुरु कृषि सेवा केंद्र सर्व माजलगाव यांचे परवाने दिनांक 15 जुन 20 पासून कायमस्वरुपी रध्द करण्यात आले आहेत. तसेच.मे.दिपक बिज भांडार, मे.ज्ञानेश्वर बीज भांडार, मे.नमन कृषि सेवा केंद्र सर्व माजलगाव यांचे परवाने दिनांक 15 जुन पासून 2020 पासुन पुढिल आदेशा पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड यांनी निलबिंत केले आहे. तसेच सर्व कषि सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके कायदा/ अधिनियमानुसार सर्व अभिलेख अध्यावत व परीपुर्ण ठेवावेत . तसेच किमतीपेक्ष्या जास्त दराने रासायनिक खताची विक्री केल्याचे आढळुन आल्यास कार्यवाही करण्यात येईल, असे आव्हाण तालुका कृषि अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी केले आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged