बीडमधील घटना ; लिफ्टमधील सगळे सुखरूप
बीड दि.3 : मनोज जरांगे पाटील हे रुग्णाला भेटायला बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आले होते. यावेळी लिफ्टने पहिल्या मजल्यावर जात असताना लिफ्टमध्ये बिघाडझाल्याने लिफ्ट खाली आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये आले होते. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील जात होते. मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह लिफ्टने पहिल्या मजल्यावर जाताच लिफ्ट अचानक बंद झाली, आणि ती पहिल्या मजल्यावरून थेट ग्राऊंड फ्लोअरला येऊन आदळली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या लिफ्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे काही सहकारी देखील होते, त्या सर्वांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले.

ओव्हरलोड झाल्याने घडली घटना
दरम्यान ही लिफ्ट ओव्हरलोड झाल्याने वर जाण्याऐवजी थेट खाली आली. मात्र नंतर त्यांना दरवाजाचे लॉक उघडून बाहेर काढण्यात आले.

