galfas sucide, atmahatya, fashi,

बीड

सहाय्यक सरकारी वकिलाच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ!

By Keshav Kadam

August 20, 2025

बीड : सातत्याने जिल्ह्यात आत्महत्याच्या घटना घडत आहेत. त्यातच वडवणी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी.पी. विनायक लिंबाजी चंदेल (वय ४०) यांनी वकिलांच्या चेंबरमधील खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवार, 20 रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, वडवणी ठाण्याच्या सहायक निरीक्षक वर्षा व्हगाडे आदींनी धाव घेतली आहे.

चंदेल यांची नुकतीच, जानेवारी २०२५ मध्ये, सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झाली होती. फक्त सात-आठ महिन्यांतच त्यांनी जीवन संपवल्याने सहकारी वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला असून पुढील तपास सुरू आहे.