Site icon कार्यारंभ लाईव्ह

गेवराईत प्रा.लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर दगडफेक

प्रतिनिधी/गेवराई
दि.२५.ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाशराव सोळंके यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद रविवारी गेवराई शहरात उमटले. संतप्त झालेल्या मराठा आणि ओबीसी समाजातील युवकांनी प्रा.हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आधी दंडुकाने मारहाण केली, नंतर तो पायाखाली तुडवून जाळला. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले होते. तसेच आमदार समर्थकांनी हाके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान सोमवारी लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला त्याच ठिकाणी दुग्धाभिषेक करून चहा पिणार असल्याचे चॅलेंज दिले होते. यावरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गटातील समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. लक्ष्मण हाके या ठिकाणी येताच विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करतात चप्पल फेकल्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तसेच गेवराई पोलिसांच्या लक्ष्मण हाके यांच्या गाडीला घेराव घालत शहराबाहेर काढले, यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. गेवराई सध्याही तणावपूर्ण परिस्थिती आहे.

Exit mobile version