बीड

वडिलांच्या आत्महत्येनंतर चार वर्षांच्या चिमुकलीचाही गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला!

By Keshav Kadam

September 11, 2025

बीड दि.11 : तालुक्यातील इमापूर येथे घडलेल्या काल (१० सप्टेंबर) रोजी भाटसांगवी येथील जयराम बोराडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची चिमुकली बेपत्ता झाली होती. आज (११ सप्टेंबर) सकाळी बीड तालुक्यातील रामगड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या दुहेरी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.