बीड, दि.6: बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांसाठीची आरक्षण सोडत सोमवारी मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राज्यातील 247 नगर पालिका आणि 147 नगर पंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. त्यात बीड जिल्ह्यातील पाच नगर पालिका तर सहा नगर पंचायतींचा समावेश आहे. गेवराई आणि परळी हे सर्वसाधारण महिलेसाठी तर बीड अनुसुचित महिलेसाठी, माजलगाव ओबीसी महिला, अंबाजोगाई, धारूर हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेले आहे. दरम्यान आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, वडवणी नगर पंचायतीचे आरक्षण देखील जाहीर झाले आहे.
ओबीसी खुला
पारनेर, तळा, घनसावंगी, भामरागड, माळशिरस, आष्टी, एटापल्ली, झरी जामणी, मंचर, पाटोदा, खानापूर, माढा, पोंभुर्णा, माहूर, वडवणी, पोलादपूर, आटपाडी, खालापूर, मालेगाव जहांगीर, शिरूर अनंतपाळ, पालम, कळवण, मंठा, सावली, कोंढाळी, जाफराबाद, चाकूर, तीर्थपुरी, कणकवली, शिरूर कासार, आष्टी (वर्धा), विक्रमगड, अकोले, जिवती, मोखाडा, कर्जत अहिल्यानगर, सुकाना
ओबीसी महिला
भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौडं, कुळगाव बदलापूर, हिंगोली, फुलगाव, मुरुड जंजीरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट, मोर्शी, नेर- नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवाडी, धामणगाव रेल्वे, वरोरा
खुला प्रवर्ग
फलटण, अहमदपूर, पाथरी, चाळीसगाव, तळोदा, वाई, नांदगाव, जयसिंगपूर, निलंगा, लोहा, खोपोली, राजगुरूनगर, कराड, जेजुरी, उमरगा, आळंदी, पुसद, बारामती, जत, पारोळा, तळेगाव दाभाडे, सासवड, गडचांदूर, रिसोड, वेंगुर्ला, पातूर, धारूर, चिखली, मेहकर, दारव्हा, सिल्लोड, सिन्नर, देवळी, मुरूम, वडगाव, महाबळेश्वर, आष्टा, दुधनी, कुंडलवाडी, खुलताबाद, नरखेड, राजुरा, सिंदखेडराजा, वाडी, डहाणू, देवळाली प्रवरा, कामठी, अक्कलकोट, सातारा, भोर, चिपळून, इंदापूर, माथेरान, श्रीगोंदा, श्रीरामपूर, मनमाड, नळदूर्ग, भोकर, बिलोली, अंबाजोगेाई, जिंतूर, सोनपेठ, गंगापूर, पांढरकवडा, घाटजी, मुर्तीजापूर, चिखलदरा, तुळजापूर
खुला प्रवर्ग महिला
परळी वैजनाथ, मुखेड, अंबरनाथ, अचलपूर, मुदखेड, पवनी, कन्नड, मलकापूर, मोवाड, पंढरपूर, खामगाव, गंगाखेड, धरणगाव, बार्शी, अंबड, गेवराई, म्हसवड, गडचिरोली, भंडारा, उरण, बुलढाणा, पैठण, कारंजा, नांदूरा, सावनेर, मंगळवेढा, कळमनूरी, आर्वी, किनवट, कागल, संगमनेर, मुरगुड, साकोली, कुरुंदवाड, पूर्णा, कळंब, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, भूम, रत्नागिरी, रहिमतपूर, खेड, करमाळा, वसमत, हिंगणघाट, रावेर, जामनेर, पलुस, यावल, सावंतवाडी, जव्हार, तासगाव, राजापूर, सिंदीरेल्वे, जामखेड, चाकण, शेवगाव, लोणार, हदगाव, पन्हाळा, धर्माबाद, उमरखेड, मानवत, पाचोरा, पेण, फैजपूर, उदगीर, अलिबाग
अनुसुचित जाती
पाचगणी, फुरसुंगी उरळी देवाची, हुपरी, शेगाव, लोणावळा, बुटीबोरी, आरमोडी, मलकापूर (सातारा), नागभिड, चांदवड, कळमेश्वर, अंजनगाव सुर्जी, आर्णी, सेलू, गडहिंग्लज, जळगाव जामोद
अनुचित जाती महिला
घुंग्घूस, अकलूज, ओझर, शिर्डी, डिगडोह देवी, तेल्हारा, शिरूर, मोहोळ, भुसावळ, वानाडोंगरी, बीड, चिमूर, देऊळगाव राजा, परतूर, मैंदर्गी, डिग्रस, सावदा
अनुसुचित जमाती
पिंपळगाव बसवन, वरूड, राहूरी, एरंडोल, अंमळनेर
अनुसुचित जमाती महिला
भडगाव (जळगाव), वणी, पिंपळनेर (धुळे), उमरी (नांदेड), यवतमाळ, शेंदूरजनघाट
नगर पंचायतीचे आरक्षणही जाहीर
बीड जिल्ह्यात एकूण पाच नगर पंचायती आहेत. 2022 मध्ये या नगर पंचायतींची निवडणूक झालेली आहे. यावेळी वडवणी, पाटोदा आणि आष्टी नगर पंचायत ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. तर शिरूर ओबीसींसाठी तर केज हे खुला प्रवर्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे.
