CORONA

बीड जिल्ह्यातून 76 स्वॅब तपासणीला

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे.

पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणे
जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-21, सीसीसी, बीड-20, स्वाराती ग्रा.वै. महा.अंबाजोगाई-3, ग्रामीण रुग्णालय, आष्टी-2, उपजिल्हा रुग्णालय केज 30 असे एकूण 76 स्वॅब पाठविण्यात आले आहेत.

Tagged