-बीड एसीबीच्या कारवाईने खळबळ
केशव कदम दि.08 ः कुठलेही टेंडर नसताना खुलेआम अवैध वाळू उपसा केला जात आहे. याप्रकरणी सातत्याने बातम्या प्रकाशित केल्यानंतरही महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच वाळूमाफियाला दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडअंती 20 हजाराची लाच स्विकारताना शनिवारी (दि.8) गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. beed acb trap news
विजय आघाव असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत होते. येथे दाखल असलेल्या वाळू चोरीच्या गुन्ह्यात वाळू माफियाला सहकार्य करण्यासाठी अघावने 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती 20 हजाराची लाच स्विकारतांना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्यासह त्यांच्या टिमने केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


